रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता

 पावसात गाडी चालवणं म्हणजे खेळ नाही, तर जनतेचा जीव धोक्यात घालणारी शिक्षा!

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता – हेच आता कळेनासं झालंय.

आणि वरून राजकारण्यांचे डायलॉग ऐका:
👉 "खड्डे पावसामुळे झाले!"
👉 "काम तात्पुरतं होतं!"
👉 "निधी कमी पडला!"

अरे, जनतेचा जीव तात्पुरता आहे का? कर कमी पडला आहे का?

प्रत्येक निवडणुकीआधी “खड्डेमुक्त शहर” म्हणत पोस्टरं चिकटवतात, पण पावसाळा आला की ते पोस्टरंही खड्ड्यांतच गाडली जातात. राजकारणी मात्र एसी गाडीतून, सायरन लावून, खड्ड्यांना टाळून जातात… आणि जनता मात्र स्कूटरवरून त्या खड्ड्यात डोकं आपटून मरते.

खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर तो अपघात नाही, तो सरळसरळ राजकीय खून आहे!
👉 ठेकेदार खुनी,
👉 अधिकारी खुनींचे भागीदार,
👉 आणि राजकारणी म्हणजे खुनींचे बॉस!

जर खरंच धाडस असेल तर –
👉 खड्ड्यामुळे मृत्यू झाला तर जबाबदार राजकारण्याला तुरुंगात टाका.
👉 निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदाराचा परवाना रद्द करा.
👉 आणि जो नेता या सगळ्यांचं संरक्षण करतो, त्याला पुढच्या निवडणुकीत थेट राजकारणाच्या खड्ड्यात गाडा!

नाहीतर उद्या रस्त्यावर चालताना खड्डा तुमचं वाहन गिळून टाकेल… आणि राजकारणी तुमच्या अंत्ययात्रेला श्रद्धांजली देऊन, पुन्हा खड्डेमुक्त रस्त्याचं आश्वासन देतील!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महामारीत काळाबाजार